आधारवड

💐💐आज गोकुळ व्रूद्धाश्रमाला (शिरूर)भेट दिली.💐(दि. 2 आँक्टोबर 2019)
तिथेच  दुर्गा, सरस्वती, कालीका,रेणुका, अशा नऊ माता भेटल्या . नवराञीचे 9 दिवस विविध खेळ किंवा रंगाची उधळण करण्यापेक्षा यांच्या भेटीतून मिळणाऱ्या आनंदाची कल्पनाच होऊ शकत नाही.
रामचंद्र सोनावणे यांनी आश्रमाची सविस्तर माहिती दिली. हा आश्रम निःशुल्क चालवला जातो. अनेक लोक भेट देऊन आनंद वाटण्याचा प्रयत्न करतात..आम्हीही सामाजिक कर्तव्य म्हणून या नऊ स्ञिया व पाच पुरुषांना फळे (केळी,सफरचंद)वाटप केले..
जीवनात जेवण देणारे एक दिवस भेट देणारे आमच्यासारखे अनेक लोक भेटतीलही पण मनाचा विरंगुळा कुणी करु शकेल का? मनाचा दुरावा मिटेल का? नातवंडात अडकलेल्या जीवांचे म्हणने कुणी ऐकून घेऊ शकेल का..??
ज्या हातानी पाऊले ऊचलायला,चालायला शिकविले त्यांचे हात आज थरथरत आहेत.त्यांना आधाराची गरज आहे हे माञ नक्की......!
😢😢

Comments